MP Assembly Election: भाजपच्या बालेकिल्ल्यात 'काटे की टक्कर'! पंतप्रधान मोदींचा उद्या इंदूरमध्ये 'रोड-शो'

PM Modi Road Show Fpr MP Assembly Election
PM Modi Road Show Fpr MP Assembly Electionesakal

इंदौर : मध्य प्रदेशची सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोर शहरात पाच मतदार संघ आहेत. या पाच मतदार संघामध्ये भाजपचे चार तर गेल्या वेळी विद्यमान आमदाराला धोबीपछाड करत एकमेव काँग्रेसची जागा आहे.

इंदोर भाजपाचे बालेकिल्ला मानले जाणारे शहर असले, तरी यावेळी मात्र 'काटे की टक्कर' पहावयास मिळत आहे. (MP Assembly Election Kate ki Takkar in BJP stronghold zone PM Modi road show in Indore tuesday political News)

इंदोर शहरात सर्वाधिक हिंदू मतदार असले तरी दुसऱ्या क्रमांकाचे मतदार मुस्लिम आहेत, असे असले तरीही इंदोर शहर हे भाजपाचे बालेकिल्ला असलेले शहर मानले जाते.

गेल्या वेळी इंदोर -1 मध्ये कांग्रेसचे आमदार संजय शुक्ला यांनी भाजपची जागा खेचून आणत धक्कादायक निकाल दिला. यावेळी भाजपाने हुकमाचा एक्का व माजी आमदार कैलास विजयवर्गीय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

आमदार शुक्ला यांचे कोरोना काळातील काम मतदार विसरलेले नाहीत, तर भाजपला ही जागा कोणत्याही परिस्थितीत काबीज करायची आहे. या ठिकाणी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.

इंदोर दोन विधानसभा मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार असूनही भाजपचे रमेश मंडोला उर्फ दादा दयालू हे सहज निवडून येतील, असे म्हटले जाते. परंतु बदलत्या हवेचा फटका त्यांना बसू शकणार नाही, अशीही शक्यता नाही. या ठिकाणी काँग्रेस कडून चिंटू चौकसी हे रिंगणात आहे.

इंदूर तीन विधानसभा मतदारसंघातही उलट फेरीची शक्यता आहे भाजपने विद्यमान आमदार आकाश विजयवर्गी यांना उमेदवारी न देता युवा चेहरा व कैलास विजयवर्गीय यांचे कट्टर समर्थक गोलू शुक्ला यांना रिंगणात उतरवले आहे.

PM Modi Road Show Fpr MP Assembly Election
MP Legislative Assembly Election: इंदौरकरांची 'मन की बात' मनातच; सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांची काँग्रेसला साथ

तर दांडगा जनसंपर्क असलेले काँग्रेसची पिंटू जोशी यांच्याकडून उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचप्रमाणे इंदोर चार विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मालिनी गौड यांना पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसने राजा मंदवाणी यांना रिंगणात उतरवले असले तर ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

इंदोर पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेंद्र हार्डीया यांच्यासमोर काँग्रेसचे सत्यनारायण पटेल यांचे तगडे आव्हान आहे. 2018 च्या निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने हार्डिया निवडून आले होते.

यावेळी पटेल यांनी पाच वर्ष मेहनत घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहे, ते बाजी मारण्यासाठीच. त्यामुळे यावेळी इंदोरच्या भाजपा बालेकिल्लात काँग्रेसने मुसंडी मारल्यास नवल वाटू नये.

मोदींचा उद्या रोड शो

राज्यात भाजप सरकार स्थापन व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते मध्य प्रदेशातील विविध मतदार संघांमध्ये प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. इंदूर मतदारसंघात भाजपची पीछेहाट बोलली जात असताना ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मंगळवारी होतो आहे.

त्यासाठी अहिल्याबाई होळकर राजवाडा आणि परिसरात कडे कोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

ठिकठिकाणी नाकाबंदी केली, तर पर्यटकांसाठी सोमवारी अहिल्याबाई होळकर राजवाडा बंद करण्यात आला होता. इंदोर भाजपा कार्यालयाकडून रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंदूर शहरात होणारा रोड शो भाजप उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदारांना प्रोत्साहन करणारा असेल या रोड शोसाठी इंदौरवासीय मोठया संख्येने उपस्थित राहतील यात शंका नाही. " - गौरव रणदिवे, जिल्हाध्यक्ष, भाजप, इंदौर

PM Modi Road Show Fpr MP Assembly Election
MP Assembly Elections: रेवड्या बांट-बांट के कुछ नहीं होगा...! काँग्रेसचे सामाजिक मुद्दे मतदारांना भावताहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com