Bhopal : भू-समाधी घेतलेले बाबा पुरूषोत्तमानंद 72 तासानंतर बाहेर; भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबा पुरूषोत्तमानंद

Bhopal : भू-समाधी घेतलेले बाबा पुरूषोत्तमानंद 72 तासानंतर बाहेर; भाविकांची गर्दी

भोपाळ : मध्यप्रदेशमधील बाबा पुरूषोत्तमानंद यांनी जवळपास ७ फूट खोल खड्ड्यात भू-समाधी घेतली होती. त्यानंतर ते आता तब्बल ७२ तासानंतर बाहेर येत असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. तर तब्बल येवढ्या काळानंतरही ते सुखरूप बाहेर आले आहेत.

हेही वाचा: Chandani Chowk Traffic: चांदणी चौकात आज पुन्हा 'ट्रॅफिक ब्लॉक'

दरम्यान, या बाबाने ३० सप्टेंबर रोजी जिवंत समाधी घेतली होती. त्यांना समादी घेण्यासाठी तब्बल सात फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यानंतर ते आज या समाधीतून बाहेर आले आहेत. तब्बल ७२ तासांच्या कठोर तपश्चर्येनंतर ते बाहेर आले असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी जमा झाली आहे. त्यांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Amit Shah: तीन तास बाहेर बसूनही अमित शाह खडसेंना भेटले नाहीत; महाजनांचा गौप्यस्फोट

तर या बाबांना समाधी घेणापूर्वी पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतर समाधी घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पण ७२ तासानंतर ते सुखरूप बाहेर आल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची रांग लागली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshbhopal