Amit Shah: तीन तास बाहेर बसूनही अमित शाह खडसेंना भेटले नाहीत; महाजनांचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah eknath khadse

Amit Shah: तीन तास बाहेर बसूनही अमित शाह खडसेंना भेटले नाहीत; महाजनांचा गौप्यस्फोट

मुंबई : "राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे या काही दिवसांपूर्वी अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांना तीन तास वाट पाहूनही अमित शाह भेटले नाहीत असं रक्षा खडसे यांनी आम्हाला सांगितलं" असा गौप्यस्फोट भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

(Girish Mahajan on Amit Shah-Eknath Khadse Meeting)

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे पुन्हा भाजपवाशी होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर त्यांनी मी आणि शरद पवार दोघे मिळून अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाजपात परत जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर ते काल (रविवारी) अखिल भारतीय महानुभव संमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते.

हेही वाचा: Mumbai Firing : मुंबईत अज्ञातांकडून गोळीबार; 1 ठार 3 जखमी

कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या कानात काहीतरी बोलले होते. आपण एकदा बसवून विषय मिटवून टाकू असं खडसे म्हणाल्याचा गौप्यस्फोट महाजनांनी केला आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. तर माध्यमांशी बोलताना अमित शाहांनी त्यांना भेटायला वेळ दिला नसल्याचं सांगितलं.

"रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे दोघेजण अमित शाहांना भेटायला गेले होते. त्यावेळी मलाही तेथून फोन आला होता. त्यानंतर रक्षाताईंनी मला सांगितलं की आम्ही तीन तास वाट पाहत बसलो पण ते आम्हाला भेटले नाही असं त्या म्हणाल्या" असा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केला आहे.