Boy Dies due to DJ Music| वरातीत नाचत असतानाच कोसळला; डीजेच्या आवाजाने जागीच जीव गेला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DJ
वरातीत नाचत असतानाच कोसळला; डीजेच्या आवाजाने जागीच जीव गेला!

वरातीत नाचत असतानाच कोसळला; डीजेच्या आवाजाने जागीच जीव गेला!

ध्वनी प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात ही गोष्ट तर जगन्मान्य आहे. पण ध्वनी प्रदुषणाने जीव जाऊ शकतो का? एका लग्नाच्या वरातीत नाचत असताना एका तरुणाचा जीव गेलाय आणि डॉक्टरांनी त्याचं कारण मोठ्या आवाजात सुरू असलेली गाणी असं सांगितलंय. हा मुलगा नाचत होता आणि नाचता नाचता अचानक खाली कोसळला आणि त्याचा जीव गेला.

१८ वर्षांचा लाल सिंग मध्यप्रदेशातल्या उज्जैन जिल्ह्यातल्या अंबोडियामधला रहिवासी आहे. तो आपल्या मित्राच्या लग्नासाठी ताजपूर इथं गेला होता. लग्न सोहळ्याची धामधूम सुरू होती. लाल सिंग आणि त्याचे मित्रही उत्साहात होते आणि मोठ्या आवाजात डीजे लावून नाचत, व्हिडीओ रेकॉर्ड करत होते.

हेही वाचा: पैसे मोजता मोजता मशीनही थकलं; 'खाणी'त १९ कोटी दडवलेली पूजा सिंघल कोण आहे?

मात्र या दरम्यानच लाल सिंग अचानक खाली कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथून त्याला उज्जैनला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. उज्जैनला हलवल्यानंतर लाल सिंगला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेनाच्या अहवालात हे समोर आलं की लाल सिंगच्या हृदयामध्ये रक्ताची गाठ होती. डॉक्टरांनी सांगितलं की ही गाठ लग्नादरम्यान मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेमुळे निर्माण झाली होती.

डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा मोठ्या आवाजात डीजे वाजवला जातो, किंवा मोठा आवाज होतो, त्यावेळी शरीरामध्ये असामान्य प्रतिक्रिया उमटतात. ठरावीक डेसिबलच्या पुढचा आवाज माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो, तसंच हृदय आणि मेंदूसारख्या अंतर्गत अवयवांना इजा होऊ शकते.

Web Title: Mp Boy Dies Dancing Doctor Claims Loud Dj Music

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya Pradesh
go to top