#MeToo : 'दहा वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात काय अर्थ'

uditraj
uditraj

नवी दिल्ली : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यामुळे बॉलिवूड व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या मुली #MeToo या मोहिमेअंतर्गत आपल्यावर झालेल्या अत्याचारांवर न घाबरता उघडपणे बोलू लागल्या आहेत. या सर्वात भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी MeToo विरोधात मत व्यक्त केले आहे. 'एखाद्या व्यक्तीवर दहा वर्षानंतर लैंगिक शोषणाचा आरोप करून काय उपयोग?' या मुळे चुकीच्या पद्धतीला सुरवात होत आहे. 

भाजपचे दिल्लीचे खासदार डॉ. उदित राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टवरून चर्चा होत आहे. 'MeToo सारखी चळवळ चांगली आहे, पण एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षानंतर अशा प्रकारचे आरोप करणे हे चुकीचे आहे. आता असे आरोप करून काय उपयोग? इतक्या वर्षानंतर या आरोपांचे समर्थन कसे करणार? यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा मलीन होते' असे राज यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे. 

कंगना राणावतने 'क्वीन' चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तर अलोकनाथ यांच्यावरही विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com