MP: अंबाला तुरुंगाच्या मातीतून गोडसे, आपटे यांचे पुतळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाला तुरुंगाच्या मातीतून गोडसे, आपटे यांचे पुतळे
हिंदू महासभेच्या ग्वाल्हेर शाखेचा संकल्प #HinduMahasabha #NathuramGodase #SakalNews

अंबाला तुरुंगाच्या मातीतून गोडसे, आपटे यांचे पुतळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/ग्वाल्हेर : नथुराम गोडसे यांना जेथे फाशी देण्यात आली त्या अंबाला कारागृहातील मातीपासून त्यांचा पुतळा निर्माण करण्याचा संकल्प हिंदू महासभेने सोडला आहे. गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी कार्यक्रम झाला. उत्तर प्रदेशामधील मेरठमधील बलीदान धाममध्ये गोडसे तसेच नारायण आपटे यांचे पुतळे बसविण्यात आले. असे बलीदान धाम प्रत्येक राज्यात उभारण्यात येईल, अशी माहिती हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल गोडसे आणि नारायण आपटे यांना १९४९ मध्ये अंबाला कारागृहात फाशी देण्यात आली. आम्ही तेथील माती गेल्याच आठवड्यात आणली. या दोघांचे पुतळे ग्वाल्हेरमधील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येतील.

जिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये ग्वाल्हेरच्या कार्यालयातील गोडसे यांचा अर्धपुतळा ताब्यात घेतला. तो अद्याप परत करण्यात आलेला नाही, असा दावाही डॉ. भारद्वाज यांनी केला. दरम्यान, ग्वाल्हेरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सत्येंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणताही पुतळा बसविण्यात आलेला नाही. संघटनेच्या हालचालींवर पोलिस लक्ष ठेवतील.

loading image
go to top