
इंदौरमध्ये पहाटे इमारतीला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
इंदौर : मध्यप्रदेशमधील इंदौरमधील एका दुमजली इमारतीला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना स्वर्णबाग कॉलनीत घडली असून त्या दुमजली इमारतीत भाड्याने लोकं राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
(Indore Fire Accident 7 Death)
साधारण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये काही लोकं जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून ही आग विझवण्यासाठी आम्हाला तीन तास लागले असं अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.
हेही वाचा: कहरच केला...: बनावट आधार कार्ड दाखवून 99 गुन्हेगारांना जामीन
पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास या दोन मजली इमारतीस आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. ही आग एवढी भयानक होती की विझवण्यासाठी तीन तास लागले. पोलिसांच्या सांगण्यावरुन या इमारतीत जास्तीत जास्त भाड्याने लोकं राहत होते.
विजयनगर पोलिस स्टेशनटे प्रभारी तहजीब काझी यांनी सांगितलं की, आग विझवल्यानंतर ५ मृतांना आणि ११ जखमींंना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं होतं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास
दरम्यान ही आग इमारतीच्या पार्किंगमधून लागली असून आगीचा भडका उडाला आणि आग पसरत गेली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून काही लोकांचा भाजून आणि काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Title: Mp Indore Building Fire Accident 7 Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..