Cheetah Cubs Born in Kuno: कुनो नॅशनलकडून पुन्हा आनंदाची बातमी, मादी चित्ता ज्वालाने तीन पिलांना दिला जन्म

Cheetah Cubs Born in Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ज्वालाने तीन पिलांना जन्म दिला आहे. तिन्ही पिल्ले पूर्णपणे निरोगी आहेत. आता उद्यानातील चित्त्यांची संख्या 17 झाली आहे.
Cheetah Cubs Born in Kuno
Cheetah Cubs Born in KunoEsakal
Updated on

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब आता वाढताना दिसत आहे. आज ज्वाला या चित्ता मादीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली होत होती. 16 जानेवारीला शौर्य नावाच्या चित्त्याचे निधन झाले होते. मात्र, आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये आज (मंगळवारी) तीन चित्त्याची पिल्ले जन्माला आली. मादी चित्ता ज्वालाने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. तिन्ही पिल्ले पूर्णपणे निरोगी आहेत. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ज्वाला चित्ताने चार पिल्लांना जन्म दिला होता. यातील तीन पिलांचा मृत्यू झाला आहे.

Cheetah Cubs Born in Kuno
Diamond Bourse: गड्या आपली मुंबईच भारी! सुरतमधील हिरे व्यापारी पुन्हा वळले मुंबईकडे; काय आहे कारण?

कुनोमध्ये आता 10 मोठे चित्ते आणि ७ पिले

कुनो नॅशनल पार्कमध्ये आज (मंगळवारी) चित्त्याच्या पिल्लांचा जन्म झाल्यानंतर चित्यांची संख्या 17 झाली आहे. त्यात सात पिलांचा समावेश आहे. नामिबियातून आणलेल्या चित्ता आशा या मादीने सुमारे महिनाभरापूर्वी तीन पिल्लांना जन्म दिला होता. यापूर्वी मार्च 2023 मध्ये मादी चित्ता ज्वालाने चार पिलांना जन्म दिला होता.

त्यातील तिघांचा काही महिन्यांतच मृत्यू झाला. कुनो व्यवस्थापनाने अति उष्णतेमुळे पिलांचा मृत्यू झाला होता असे सांगितले होते. ही मादी चित्ता आधी सिया या नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव ज्वाला ठेवण्यात आले. ज्वालालाही नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहे.

Cheetah Cubs Born in Kuno
Video : राहुल गांधींसमोरच भिडले कार्यकर्ते अन् पोलीस! काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गदारोळ

केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली

बऱ्याच दिवसांनी कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. येथे आफ्रिकन देश नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता ज्वालाने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. सध्या या पिल्लांना एका मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले असून, तेथे डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. अशी माहिती केंद्रिय मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर पोस्ट केले - 'जंगलात पिलांचा आवाज झाला. कुनो नॅशनल पार्क तीन नवीन सदस्यांचे स्वागत करत आहे हे सांगताना आनंद होत आहे. नामिबियातून आणलेल्या ज्वाला या मादी चित्ताने या ३ पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रिय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढे लिहिले - कुनो राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, सर्व तज्ञ, आणि संपूर्ण देशातील वन्यजीव प्रेमींना माझ्या शुभेच्छा.

Cheetah Cubs Born in Kuno
Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com