esakal | क्रौर्याचा कळस! नवऱ्याने बायकोला प्यायला लावलं अ‍ॅसिड
sakal

बोलून बातमी शोधा

rape and after murderd

क्रौर्याचा कळस! नवऱ्याने बायकोला प्यायला लावलं अ‍ॅसिड

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (dcw chief) नियुक्ती होताच स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनी नवऱ्याने पत्नीला अ‍ॅसिड प्यायला (to drin acid) लावल्याच्या मुद्यावरुन रान उठवलं आहे. मध्य प्रदेशातील (madhya pradesh) ग्वालेरमधील ही घटना असून पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेच्या नवऱ्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. (MP Man Forces Wife to Drink Acid Booked for Attempt to Murder After DCW Intervenes dmp82)

अत्यंत क्रूर प्रकारात मोडणारी ही घटना आहे. पीडित महिलेच्या गळ्यापासून ते पोटापर्यंतच्या अंतर्गत अवयवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून आरोपी नवऱ्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

महिलेला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी तसेच असंवेदनशील पद्धतीने हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी मालिवाल यांनी मुख्यमंत्री चौहान यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. पीडित महिलेला नवऱ्याने आणि नणंदेने जबरदस्तीने अ‍ॅसिड प्यायला लावले. २८ जून रोजी ही घटना घडली.

हेही वाचा: मुंबईत पावसाचा जोर वाढला, अद्यापपर्यंत रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत

सुरुवातीला मध्य प्रदेश पोलिसांनी महिलेच्या सासू-सासऱ्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवली होती. पण दिल्ली महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर आणखी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. मुख्य आरोपी विरेंद्र जाटव विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. तो महिलेचा पती आहे. जाटवच्या बहिणी विरोधात छळ केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

loading image