'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede
'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला होता. त्यातच आता नवाब मालिकांनी नवीन फोटो समोर आणला आहे. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.

हेही वाचा: तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या

नवाब मलिक यांनी समोर आणलेला हा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून समीर वानखेडे यांचा आहे. मात्र यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येताय. कबूल, कबूल, कबूल असं म्हणत त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत, ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असं दिसून येतं आहे. त्यानंतर आता हा फोटो समोर आला आहे.

मंत्री नावाब मलिक हे नुकतेच परदेशात गेले असून त्यांनी स्वतः त्यांच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती दिली होती. "मी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन दुबईला जात आहे. मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती" असं म्हणत त्यांनी ही माहीती दिली होती.

हेही वाचा: "ही वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी..."; नवाब मलिकांचं नवं ट्विट

दरम्यान, जो फोटो मलिक यांनी ट्विट केलाय, त्यामध्ये समीर वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसल्याचे दिसता आहेत. तर त्यांच्या बाजूला बसलेले एक मुस्लीम गृहस्थ हातातील कागदपत्रांवर त्यांच्या सही घेताना दिसता आहेत. त्यामुळे आता वानखेडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

loading image
go to top