Fake Currency Racket Busted
esakal
मध्य प्रदेश पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. भोपाल, खंडवा आणि रतलाम येथे छापेमारी करत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखोंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला भोपालमधून अटक करण्यात आली असून त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापल्याचं पोलिसांना सांगितलं.