गोगटे उड्डाणपूल 20 नोव्हेंबर पूर्वी खुला - सुरेश अंगडी

गोगटे उड्डाणपूल 20 नोव्हेंबर पूर्वी खुला - सुरेश अंगडी

बेळगाव  - शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला गोगटे उड्डाणपूल 20 नोव्हेंबरपर्यंत बेळगावकरांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सवापूर्वी याचे काम पूर्ण होणार होते परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासदार अंगडी यांनी महापालिका आयुक्त तसेच रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. आधी खासदारांनी त्यांच्याशी चर्चा करून नंतर पत्रकारांना माहिती दिली.

शहापूर, वडगाव सह त्या परिसरातील लोकांना येण्या-जाण्यासाठी गोगटे उड्डाणपूल महत्त्वाचा दुवा होता. परंतु, त्याची वैधता संपल्याचे सांगत 9 महिन्यांपूर्वी तो जमीनदोस्त करण्यात आला. यानंतर नवीन पुलाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते. नऊ महिने झाले तरी अद्याप हे काम का पूर्ण झाले नाही? असा प्रश्न अंगडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. पावसामुळे काम झाले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सातत्याने तारखा देऊ नका आता अंतिम तारीख सांगा, असे खासदारांनी खडसावल्यानंतर अधिकाऱ्यांनी 15 ते 20 नोव्हेंबर अशी तारीख दिली.

यानंतर खासदारांनी 20 नोव्हेंबर पूर्वी पुलाचे काम पूर्ण करून तो बेळगावकरांसाठी खुला करावा, अशी सूचना केली.  पुढील महिन्यात 15 ऑक्टोबरला दुसऱ्या व तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळील अंडरब्रीज कामाचे भूमीपूजन होणार असल्याचेही खासदार अंगडी यांनी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त शशिधर कुरेर, साऊथ वेस्टर्न रेल्वेचे मुख्य अभियंते प्रेम नारायण, उपअभियंते अमर गुंडाप्पा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर कर्नल जानबाज आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com