
MP Udayan Bhosale Slams Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलगीरी व्यक्त केली असतानाही अद्यापही त्यांच्याविरोधात संतापाची लाट आहे. छत्रपतींचे वारस असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
याचा मी कठोर शब्दात निषेध करतो, असं सांगताना अत्यंत संतापलेल्या अवस्थेत त्यांनी अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अशा कलाकारांचे सिनेमे आणि कार्यक्रम बंद पाडले पाहिजे अशा आशयाचं आवाहन त्यांनी केलं आहे.