MP Urination Case: लघुशंका प्रकरणातला पीडित नव्हे, तर दुसऱ्याच व्यक्तीचे पाय मुख्यमंत्र्यांनी धुतले? चर्चांना उधाण

खरा पीडित बेपत्ता असल्याची शंकाही काही जणांनी उपस्थित केली आहे.
MP Urination Case
MP Urination CaseSakal
Updated on

मध्यप्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात झालेल्या घटनेवरुन राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. भाजपा कार्यकर्त्याने एका आदिवासी व्यक्तीच्या अंगावर लघुशंका केल्याचं हे प्रकरण आहे. यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्या व्यक्तीचे पायही धुतले होते. पण आता यावरुनच टीका केली जात आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित दशमत रावत यांचे पाय धुतले आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण आता हा पीडित नसून कोणीतरी वेगळाच माणूस असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षांपासून सोशल मीडिया युजर्सपर्यंत सर्वजण हेच म्हणत आहेत की पीडित व्यक्तीच्या ऐवजी कोणा दुसऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भोपाळला नेण्यात आलं.

MP Urination Case
MP Urination case: CM चौहान यांनी 'त्या' आदिवासी व्यक्तीचे पाय धुतल्यानं सुटणार आरोपी!

दशमत रावत यांची उंची, अंगकाठी, दिसणं या सगळ्यावरुन हे दावे करण्यात येत आहेत. मध्यप्रदेश काँग्रेसने रविवारी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये म्हटलं आहे की, सिधी लघुशंका प्रकरणामध्ये मोठा खुलासा, शिवराज यांनी कोणा दुसऱ्याच व्यक्तीचे पाय धुण्याचं नाटक केलं. खरा पीडित बेपत्ता आहे का? शिवराजजी, इतका मोठा कट? मध्यप्रदेश तुम्हाला माफ करणार नाही.

MP Urination Case
Sidhi Urinating Case : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी का मागितली माफी

या आधी सोशल मीडियावरही पीडित खरा की खोटा यावरुन अनेक बाजूंनी चर्चा रंगत होत्या. आरोपी प्रवेश शुक्ला याने ज्या आदिवासी मुलाच्या अंगावर लघुशंका केली होती तो व्यक्ती आणि दशमत रावत यांच्यात खूप फरक आहे. पीडित मुलाचं वय १६-१७ आहे असं वाटतं, ज्याचे पाय धुतले गेले, त्या रावत यांचं वय ३५-३८ च्या आसपास असावं असं वाटतं. शिवाय व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाचे केस काळे, दाट आणि कुरळे आहेत. तसंच पीडित मानसिक रुग्ण वाटत आहे. पण दशमत रावत यांचे केस पांढरे असून मानसिक स्थितीही ठीक असल्याचं निरीक्षण काही नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे?

या प्रकरणाबद्दल सिधीचे पोलीस अधीक्षक रविंद्र कुमार वर्मा यांनी या अफवांचं खंडन केलं आहे. कुबरी गावामध्ये झालेल्या अपमानकारक घटनेचा पीडित दशमत रावत यालाच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर कलेक्टर साकेत मालवीय यांनीही या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.