'मंत्री नागेश यांचे भाजपकडून अपहरण'

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

बंगळुरु: कर्नाटकमधील राजकीय उलथापालथ काही केल्या कमी होताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षावर आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, आमदार नागेश यांचे भाजपकडून अपहरण करण्यात आले होते.

शिवकुमार यांनी म्हटले आहे की, मला आताच आमदारकीचा राजीनामा दिलेले मंत्री असलेले अपक्ष आमदार नागेश यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले की, त्यांचे येडियुरप्पांचे स्वीय सहाय्यक आणि भाजपकडून अपहरण करण्यात आले असून मला विमानतळावर आणण्यात आले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारवरील संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देखील देण्यात आली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अपक्ष आमदार नागेश यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ते भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असल्याचे बोलले जात असतानाच डी के शिवकुमार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr Nagesh hijacked by Mr Yeddyurappas PA and BJP says DK Shivkumar