ST Reservation Discount : एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट दरात मिळणार १५% सूट; कोणाला मिळणार ही सवलत, जाणून घ्या

MSRTC 15 percent discount Advance ticket booking : एसटीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५% सूट मिळणार आहे. ही सुविधा 1 जुलैपासून सुरू होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे
MSRTC 15 percent discount Advance ticket booking Pratap Sarnayak
MSRTC 15 percent discount Advance ticket booking Pratap Sarnayakesakal
Updated on

MSRTC Advance booking discount : महाराष्ट्रातील सरकारी बस सेवा एसटीमध्ये प्रवाशांसाठी मोठा दिलासा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट देण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ही योजना १ जुलै २०२५ पासून लागू होणार असून, १५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहे.

या योजनेअंतर्गत पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना, सवलतधारक प्रवासी (जसे की वृद्ध, विद्यार्थी, किंवा इतर सवलतीचे पात्र असलेले प्रवासी) वगळता, तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार आहे. योजनेचा उद्देश प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षणासाठी प्रोत्साहित करणे व प्रवासाचा गडबडीत काळ वगळता वर्षभर हा लाभ देणे आहे. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीसारख्या गर्दीच्या हंगामात या सूट योजनेचा लाभ मिळणार नाही.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनी या योजनेची घोषणा केली होती. त्यांनी प्रवाशांना आवाहन केले की, "गर्दी कमी असलेल्या काळात प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुकिंग करून योजनेचा लाभ घ्यावा. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल."

MSRTC 15 percent discount Advance ticket booking Pratap Sarnayak
नात्याला काळिमा फासणारी घटना! सावत्र बापानं अल्पवयीन मुलीवर सहा महिने केला बलात्कार; दोन महिन्यांची गर्भवती राहिली अन्...

विशेष काळातही योजनेचा लाभ

आषाढी एकादशीच्या सणासुदीच्या काळात तसेच गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकण भागात मोठ्या संख्येने प्रवासी एसटीचा वापर करतात. या काळातही आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५% सूट मिळणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. पंढरपूर आणि कोकणासाठी जाणाऱ्या नियमित बसेससाठी ही सवलत लागू असून, त्यामुळे भक्तांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

ई-शिवनेरी बस प्रवाशांसाठी विशेष सवलत

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रतिष्ठित 'ई-शिवनेरी' एसटी बससाठीही ही योजना लागू होणार आहे. या बसेसच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास १५ टक्के सूट मिळेल. तिकीट प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (msrtcors.com), मोबाईल अॅप (martc Bus Reservation) किंवा तिकीट काउंटरवरून आगाऊ आरक्षण करून सवलतीचा लाभ घेता येईल.

MSRTC 15 percent discount Advance ticket booking Pratap Sarnayak
Shubhanshu Shukla : अंतराळ मोहिमेत ऐतिहासिक क्षण; शुभांशू शुक्ला भारताशी साधणार रेडिओ संवाद, लाईव्ह सेशन तुम्ही 'असं' करू शकता जॉईन..

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, या योजनेमुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास उपलब्ध होईल. आगाऊ आरक्षणामुळे प्रवास व्यवस्थापन अधिक सुकर होईल आणि गर्दीचे नियोजनही उत्तम होऊ शकेल. परिणामी एसटी महामंडळाला देखील आर्थिक बचत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी बनवता येईल.

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे किंवा स्थानिक तिकीट काउंटरवर संपर्क साधणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com