‘म्युकरमायकॉसीस’साठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे

अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या आजाराचा संसर्ग वाढल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत.
‘म्युकरमायकॉसीस’साठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे
Summary

‘म्युकरमायकॉसीस’पासून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने यावर काही गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये लक्षणे, कारणे यासह बचावासाठी काय करायचं याची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली/ पुणे - कोरोनातून (Corona) बऱ्या झालेल्या आणि रोगप्रतिकारशक्ती नसलेल्या निवडक रुग्णांना ‘म्युकरमायकॉसीस’ (Mucormycosis) हा बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता असते. अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या आजाराचा संसर्ग वाढल्याने यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. ‘म्युकरमायकॉसीस’पासून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry Of India) यावर काही गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये लक्षणे, कारणे यासह बचावासाठी काय करायचं याची माहिती देण्यात आली आहे. (Mucormycosis guidelines by government of india)


काय आहे म्युकरमायकॉसीस?
या दुर्मिळ बुरशीजन्य आजाराचा संसर्ग तोंड अथवा नाकाद्वारे होतो. तोंडावर असलेल्या सायनसमध्ये ही बुरशी वाढते. पर्यायाने बुरशीच्या संपर्कात येणाऱ्या पेशी, हिरड्या, डोळ्यांच्या नसा आदी ती नष्ट करते. नाकाद्वारे डोळे नंतर मेंदूपर्यंत ही बुरशी जाते. वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचाराने या आजार रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

‘म्युकरमायकॉसीस’साठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे
कोरोना रुग्णांना DRDO चे 2DG औषध पुढच्या आठवड्यात मिळणार

लक्षणे -
- चेहऱ्यावर सूज येणे, गाल प्रचंड दुखणे
- डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
- दृष्टी कमी होणे
- डोके दुखणे, नाक चोंदणे
- रक्ताळ किंवा काळसर जखम
- दात, दाढ अथवा हिरड्या दुखणे

संभाव्य कारणे -
- अनियंत्रित मधुमेह- कोरोना उपचारादरम्‍यान अतिरिक्त स्टेरॉईड आणि इम्युनोमॉड्यलेटरचा वापर
- उपचारासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेटरचा वापर
- जास्त काळ ऑक्सिजनद्वारे उपचार

‘म्युकरमायकॉसीस’साठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे
भारतात उपलब्ध होणारी स्फुटनिक व्ही लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही;पाहा व्हिडिओ

बचावासाठी काय कराल?
- कोरोनातून बरे झाल्यानंतर घरातही मास्क वापराच
- डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्सरे काढा
- घरातील बुरशी वाढते अशी ठिकाणे, धुळीपासून दूर रहा
- रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या
- डॉक्टरांच्या सल्ल्याने बुरशी विरोधी औषधे घ्या
- वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

हे करा -
- रक्तातील साखर नियंत्रित करा
- कोविड उपचारादरम्यान स्टेरॉईडचा नियंत्रित वापर करा
- रुग्णाला ऑक्सिजन देताना स्टराईल पाण्याचा वापर करा
-अँटिबायोटिक्स, अँटिफंगल औषधांचा योग्य वापर करा

‘म्युकरमायकॉसीस’साठी केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे
कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक V; असा आहे 3 लशींमध्ये फरक

हे करू नका
- लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
- नाक चोंदणे अथवा बंद होणे प्रत्येकवेळी सर्दी नसेलच
- निदान झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांना भेटा

लक्षणे दिसल्यास कोणाकडे जाणार?
- कान-नाक-घसा तज्ज्ञ
- डोळ्याचे डॉक्टर
- तोंडाचे किंवा दाताचे डॉक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com