मुघल वंशज देणार राम मंदिरासाठी सोन्याची वीट

Habib-Uddin-Tusi
Habib-Uddin-Tusi

नवी दिल्ली : राम मंदिर उभारण्यासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसला तरी राम मंदिर उभारण्यासाठी सोन्याची वीट देणार असल्याची घोषणा बाबरच्या वंशजांनी केली आहे. 

मुघल साम्राज्याचा अखेरचा बादशहा बहादुर शहा जफरचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'जर अयोध्यामध्ये राम मंदिराची उभारणी झाली, तर आमच्या कुटुंबाकडून या मंदिरासाठीची पहिली वीटसोबत सोन्याची वीटही देण्यात येईल, असे तुसी यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात पक्षकार होण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तुसी यांनी दावा केला की, ज्या जागेबद्दल वाद सुरू आहे, त्याच्या मालकी हक्काचा पुरावा कोणाकडेच नाही. त्यामुळे मुघल वंशज या नात्याने त्यांना स्वत:ची बाजू कोर्टासमोर मांडायची असून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे तुसी म्हणाले.

तुसींचा धक्कादायक दावा
प्रथम मुघल शासक बाबरने 1529 मध्ये त्याच्या सैनिकांना नमाज पढण्यासाठी बाबरी मशिदीची स्थापना केली होती. या ठिकाणी केवळ सैनिकांनाच प्रवेश होता. इतरांना या ठिकाणी नमाज पढण्याची परवानगी नव्हती.

मशीद उभारण्यापूर्वी या ठिकाणी काय होते, याबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य करणे टाळले. मात्र, जर हिंदूंना या ठिकाणी श्री राम यांचा जन्म झाला असून त्याठिकाणी राम मंदिर उभारायचे असेल, तर एक सच्चा मुस्लिम होण्याच्या नाते मी त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, असा दावा तुसींनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com