Mughal History : सलीमला तख्तावर बसवणाऱ्या मेहरुन्निसाची कथा, जी पुढे जाऊन मलिका-ए-हिंदुस्थान बनली

मुघल सल्तनतमध्ये सिंहासनावर बसण्यासाठी कायमच बंडखोरी
Mughal History
Mughal Historyesakal

Mughal History : मुघल सल्तनतमध्ये सिंहासनावर बसण्यासाठी कायमच बंडखोरी झाली. कधी भावाने भावाला मारलं तर कधी मुलाने आपल्याच वडिलांना कैद केलं. पण एका नृत्यांगणेसाठी राजकुमाराने बादशहा बरोबर केलेली बंडखोरी संबंध भारतात प्रसिद्ध आहे. ही नृत्यांगना होती अनारकली.

Mughal History
Pickle Making Tips : लोणचे बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे म्हणजे लोणचे टिकेल?

सलीमने केलेल्या बंडाचा सम्राट अकबरला इतका राग आला की त्याने सलीमला मुघल सल्तनतमधून बेदखल केलं. पण मग असं काय घडलं की अकबरानेच सलीमला आपला वारस नेमलं?

Mughal History
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

सम्राट अकबराच्या विरोधात बंड करणाऱ्या सलीमची समजूत घालण्यासाठी अकबराने स्वतः जोधाबाईला पाठवले होते, असे म्हणतात. जोधाबाई ही सलीमची आई होती, जिच्या सांगण्यावरून सलीमने बंडखोरी सोडून दिली.

Mughal History
Summer Health Problems : उन्हाळ्यातल्या या आजारांकडे करू नका दुर्लक्ष; जीवही जाऊ शकतो!

सलीम राजवाड्यात परतला. येथे त्याची भेट घियास बेगची मुलगी मेहरुन्निसा हिच्याशी झाली. घियास बेग अकबराचा खास मानला जात असे. सलीम राजवाड्यात परतला होता, पण त्याला राजवाड्यात सुरू असलेल्या कटाची कल्पना नव्हती.

Mughal History
Ishita Dutta : दबक्या पाऊलांनी हळूच कोणीतरी येणारं गं...

इतिहासात अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की त्याला गादी नको होती, पण जेव्हा त्याला कळले की त्याचे वडील म्हणजेच अकबर आपल्या मुलाला वारस बनवायचे आहे तेव्हा तो नक्कीच अस्वस्थ झाला. मेहरुन्निसा यांना यावेळी गरज होती. असे म्हणतात की मेहरुन्निसा यांनी राजवाड्यातील घडामोडी सलीमपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली होती.

Mughal History
Ishita Chauhan : साडीत शोभुनी दिसतयं तुझ हटके सौंदर्य...

अकबराने रागाच्या भरात लग्न केलं

सलीम पूर्वीपासूनच बदनामी, दारू आणि महिलांसाठी कुप्रसिद्ध होता. अशा परिस्थितीत मेहरुन्निसाने सलीमशी जवळीक साधण कठीण नव्हते. जेव्हा अकबराला सलीम आणि मेहरुन्निसा यांच्याबद्दल कळले तेव्हा त्याने तिचे लग्न इराणी व्यापारी शेर अफगाणशी लावून दिलं. मेहरुन्निसाने शेर अफगाणशी लग्न केले, पण तोपर्यंत तिने सलीमच्या मनात सिंहासनाविषयीची इच्छा जागृत झाली. सलीमला गादीवर बसावावं अशी जोधाबईची देखील इच्छा होती.

Mughal History
Travel Story : हनिमूनसाठी भारतातील स्वस्तात मस्त ठिकाणे

खुसरोला सम्राट बनवण्याचा कट रचला गेला होता. पण तोपर्यंत सलीमच्या मनात मेहरुन्निसाने सिंहासनाविषयी आकर्षण निर्माण केले होते. त्याने शाही दरबारातील लोकांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केली, जेव्हा अकबर आजारी पडला तेव्हा खुसरोला वारस बनवण्याची चर्चा होती. परंतु तेव्हा सलीम चगताई यांनी त्यास विरोध केला आणि सांगितले की वडील जिवंत असताना मुलाने गादीवर बसणे योग्य नाही. यानंतर अकबराने जहांगीरला सम्राट म्हणून घोषित केले.

Mughal History
Stone River : जगातील एकमेव नदी जिथे पाण्याऐवजी वाहतात दगड

1605 मध्ये जहांगीर तख्तावर बसला. यानंतर त्याने मेवाड जिंकले. परंतु मेहरून्निसाने हार मानली नाही. जहांगीरने मेहरुन्निसा यांच्या पतीची हत्या करून मेहरुन्निसाला न्यायालयात बोलावल्याचं सांगितलं जातं. जहांगीरने 1611 मध्ये तिच्याशी लग्न केलं आणि तिला मलिका-ए-हिंदुस्तान ही पदवी मिळाली. ही मेहरुन्निसा पुढे नूरजहाँ म्हणून ओळखली जाऊ लागली. जी मुघल साम्राज्याची सर्वात शक्तिशाली महिला बनली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com