पाक खासदारावर देशद्रोहाची तयारी; 'अभिनंदन' यांना परतवण्याबाबतचं सत्यकथन भोवलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी स्पीकर अयाज सादिक यांच्याविरोधात आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे.

इस्लामाबाद : इंडियन एअरफोर्सचे ऑफिसर विंग कमांडर अभिनंदन यांना भारताला परत करण्याबाबतचे सत्य सांगणारे पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांच्यामागे आता इमरान खान सरकार हात धुवून मागे लागली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी स्पीकर अयाज सादिक यांच्याविरोधात आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे. 

याआधी इमरान खान सरकारमधील सूचना मंत्री शिबली फराज यांनी म्हटलं की अयाज सादिक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आता पाकिस्तानचे गृह मंत्री इजाज शाह यांनी शनिवारी म्हटलंय की सरकारला अनेक याचिका मिळाल्या आहेत ज्याच्यात ही मागणी केली गेली आहे की, अयाज सादिक यांच्याविरोधात पाकिस्तानी संविधानाच्या कलम 6 अनुसार खटला चालवला जावा. कलम 6 नुसार देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो. ननकाना साहिबमध्ये आणखी एका रॅलीला संबोधित करताना इजाज शाह यांनी म्हटलं की या याचिकांना कायदेविभागाकडे पाठवलं गेलं आहे आणि त्यानुसार कारवाई होत आहे.

हेही वाचा - आम्ही इस्लामविरोधी नाही पण हिंसाचारही अमान्य- फ्रान्स

पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांचा संसदेतील एका वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या वक्तव्यात पीएमएल नेते अयाज सादिक यांनी म्हटलंय की, अभिनंदनची काय गोष्ट सांगता, मला आठवतंय की शाह महमूद कुरैशी त्या बैठकीत होते ज्या बैठकीत यायला इमरान खान यांनी नकार दिला होता. तेंव्हा कुरैशी साहेबांचे पाय थरथर कापत होते. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. शाह महमूद कुरैशी साहेबांनी म्हटलं की अल्लाहसाठी, अभिनंदनला परत जाऊ द्या. कारण, रात्री 9 वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करत आहे. 

अयाज सादिक यांच्या वक्तव्याने पाकमध्ये खळबळ
पीएमएल नेत्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. अयाज सादिक यांचे हे वक्तव्य पाकिस्तानच्या संसदेतील आहे, त्यामुळे या वक्तव्याबाबत कसलीही शंका नाहीये. शुक्रवारी शिबली फराज यांनी म्हटलं की अयाज सादिक यांनी जे काही वक्तव्य केलं आहे ते क्षमायोग्य नाहीये. आता कायदाच आपले काम करेल. त्यांनी म्हटलं की, देशाला कमकुवत करणारी वक्तव्ये करणे हा अक्षम्य अपराध आहे. यासाठी त्यांना शिक्षा दिली जाईल. 

हेही वाचा - 'रहस्यमयी' पत्नीला सांगितल्याशिवाय इम्रान खान करत नाही कोणतंही काम!

आणि अभिनंदन भारतात परतले
27 फेब्रुवारी 2019 रोजी विंग कमांडर अभिनंदन यांचं विमान पाकिस्तानच्या ताब्याती काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं जिथे पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना बंदी बनवलं होतं. याआधीच 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी स्थळांना भारताने नेस्तनाबूत केलं होतं. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली होती. यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना परत पाठवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan government proceeding against ayaz sadiq for statement over release of abhinandan