मुकेश अंबानींना झटका! टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून दोन स्थानांनी घसरण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 2 November 2020

शुक्रवारपर्यंत मुकेश अंबानी या यादीत पाचव्या स्थानावर होते. आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली.

नवी दिल्ली: जगभरातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत भारतातील रिलाइन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सध्या जाहीर केलेल्या ताज्या यादीत जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सातव्या स्थानावर घसरले आहेत.

शुक्रवारपर्यंत ते या यादीत पाचव्या स्थानावर होते. आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियरनुसार सोमवारी RILचे प्रमुख मुकेश अंबानींचं नेट इनकम 3.7 अब्ज डॉलरने कमी झाले आहे. सध्या अंबानींची संपत्ती 74.6 अब्ज डॉलर आहे.

मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती

आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्पेस एक्सचे अॅलन मस्क आणि वॉरेन बफेट यांनी मागे टाकले आहे. शुक्रवारी फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे मार्क झुकरबर्गची मालमत्ताही घसरली आहे, पण मार्क झुकेरबर्ग 96.7 अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीत अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस प्रथम स्थानावर आहेत.

   श्रीमंत व्यक्ती                              कमाई
1    जेफ बेजोस                             179.4 अब्ज डॉलर
2    बर्नार्ड अर्नाट एंट फॅमिली           113.3अब्ज डॉलर
3    बिल गेट्स                               112.8 अब्ज डॉलर
4    मार्क जुकरबर्ग                         96.7 अब्ज डॉलर
5    एलन मस्क                              87.0अब्ज डॉलर
6    वॉरेन बफेट                             76.2अब्ज डॉलर
7    मुकेश अंबानी                         74.6अब्ज डॉलर
8    लॅरी एलिशन                          74.2अब्ज डॉलर
9    स्टीव बॉल्मर                           71.9अब्ज डॉलर
10    लॅरी पेज                             69.9अब्ज डॉलर

Good News: देशातील दोन मोठ्या बॅंकांची व्याजदरात कपात; होम लोन, ऑटो लोनही स्वस्त

रिअल टाइम बिलियनेयर रॅकींगमध्ये दररोज सार्वजनिक होल्डिंग्जमधील चढउतारांची माहिती मिळत असते. जगाच्या वेगवेगळ्या भागात शेअर बाजार सुरू झाल्यानंतर दर 5 मिनिटांनी निर्देशांक अपडेट केला जातो. ज्यांची मालमत्ता खासगी कंपनीची आहे अशा व्यक्तींची निव्वळ किंमत दिवसून एकदा अद्ययावत केली जाते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani forbes world richest list at 7 position