'मुकेश अंबानी यांनी पैशासाठी अनिल अंबानींना भीक मागायला लावली होती'

Mukesh Ambani had made his brother Anil Ambani beg for money said Bloomberg report
Mukesh Ambani had made his brother Anil Ambani beg for money said Bloomberg report

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी पैशांसाठी आपले बंधू अनिल अंबानी यांना भीक मागायला लावली होती, असा खळबळजनक दावा ब्लुमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षी एरिक्शन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस अनिल अंबानी यांना अटक करणार होते. यावेळी पैशांसाठी अनिल यांनी आपल्या मोठ्या भावाकडे मदत मागितली होती. तेव्हा 460 कोटी रुपयांसाठी मुकेश अंबानी यांनी त्यांना भीक मागायला लावली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी अनिल अंबानी अनेक आठवडे आपले मोठे बंधू मुकेश यांच्याशी चर्चा करत होते. त्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. यावेळी अनिल अंबानी यांनी आपल्या मुंबई स्थिती कार्यालयाची इमारत 99 वर्षांच्या लीजवर मुकेश यांना दिल्यावर मुकेश यांनी आर्थिक मदत केली होती.
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
सर्वोच्च न्यायालयाने स्वीडनमधील दूरसंचार कंपनी एरिक्सनला 550 कोटी देण्याचा आदेश अनिल अंबानी यांना दिला होता. असे न केल्यास तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. न्यायालयाने अनिल अंबानी यांना एक महिन्याची मुदत दिली होती. तेव्हापासूनच अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात चर्चा सुरु झाली होती. मात्र, मुकेश अंबानी यांनी अनिल यांना सहजासहजी मदत केली नाही. अनिल यांना पैशासाठी त्यांच्यासमोर भीक मागायला लावली. तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी अनिल यांनी आपल्या मोठ्या बंधूच्या सर्व अटी मान्य केल्या होत्या, असा दावा ब्लुमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे.

अनिल अंबानी यांच्यासह कंपनीच्या दोन डाकरेक्टरांनाही न्यायालयाने दोषी ठरवले होते. तसेच प्रत्येकी एक करोड रुपये नुकसान भरपाई देण्यास सांगितले होते. एका महिन्यात पैसे भरले नाही तर एक महिन्याचा तुरुंगवास भोगण्याची शिक्षा सुनावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com