Mukhtar Ansari : ''मी योग्य वेळेची वाट बघतोय...'' मुख्तार अन्सारीचा भाऊ नेमकं काय म्हणाला?

अफझल म्हणाले की, मुख्तार अन्सारीचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला आहे. तो जेलमध्ये असताना त्याला विष देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. योग्य वेळ आल्यास आपण आपल्या भावाच्या मृत्यूबाबत सिद्ध करुन दाखवू, असं ते म्हणाले.
Mukhtar Ansari
Mukhtar Ansariesakal

नवी दिल्लीः गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर पूर्वांचलमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्तार अन्सारीचे भाऊ अफझल अन्सारी यांनी मुख्तारला गरिबांचा मसिहा म्हटलं आहे. वास्तविक सरकारी कागदपत्रांमध्ये मुख्तार एक गुन्हेगार आहे. मुख्तारचे भाऊ आणि गाझीपूरमधील समाजवादी पक्षाचे लोकसभा उमेदवार अफझल अन्सारी यांनी एक दावा केलाय.

अफझल म्हणाले की, मुख्तार अन्सारीचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला आहे. तो जेलमध्ये असताना त्याला विष देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. योग्य वेळ आल्यास आपण आपल्या भावाच्या मृत्यूबाबत सिद्ध करुन दाखवू, असं ते म्हणाले. 'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अफझल यांनी हा इशारा दिला. आपण योग्य वेळेची वाट बघतोय, असंही ते म्हणाले. त्यामुळे योग्य वेळ नेमकी कोणती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुलाखतीमध्ये अफझल म्हणाले की, परिवर्तन अटळ आहे. त्या परिवर्तनानंतर केवळ मुख्तार अन्सारीच नाही तर अनेक मृत्यूंबाबत पर्दाफाश होईल. लोक भाजपला बेदखल करुन माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेतील, असं ते म्हणाले.

Mukhtar Ansari
Loksabha election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजेंना प्रतीक्षा कायम; 'या' ९ उमेदवारांचा समावेश

दरम्यान, यापूर्वी माध्यमांशी बोलताना अफझल यांनी सांगितलं की, मृत्यूच्या काही तास अगोदर मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी आणि सुन निखत यांच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यांच्यातील झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो ऐका, असं अफझल यांनी सांगितलं.

''व्हिडीओमध्ये मुख्तार स्पष्टपणे म्हणतोय की, दहा दिवसांपासून न मोशन झाले न लघुशंका. स्वतःहून उठता-बसताही येत नाही. आयसीयूमधून थेट जेलमध्ये पाठवणारा डॉक्टर म्हणतोय की, त्यांची प्रकृती ठीक आहे. जर प्रकृती ठीक होती तर २४ तासांमध्ये मृत्यू कसा झाला?'' असा सवाल अफझल यांनी उपस्थित केला आहे.

मुलाखतीमध्ये अफझल यांनी तोच मुद्दा पुढे उपस्थित करत मुख्तारच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीत या मुद्द्याचा अफझल यांना नक्कीच फायदा होईल. शिवाय आपण योग्यवेळी मुख्तारचा मृत्यू कसा झाला, हे सिद्ध करुन दाखवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Mukhtar Ansari
Milind Deora: दक्षिण मुंबईशी भावनिक नाते, मी अजूनही लढण्यास इच्छुक, मुलाखतीतून देवरांनी व्यक्त केली भावना

''पाच-दहा वर्षानंतर मृतदेहाची तपासणी करता येणार''

मुख्तारच्या मृत्यूनंतर अफझल यांनी थेट धमकीच्या आवेशात म्हटलं होतं की, मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाला अशा पद्धतीने दफण करण्यात आलेलं आहे पाच-दहा वर्षांनंतर तपासणी करायचं म्हटलं तर तो मृतदेह कबरीतून बाहेर काढता येऊ शकेल. मुख्तारची कहाणी संपलेली नाही, आता सुरु झालीय. जेलमध्ये टाकल्यानंतर त्याच्याविरोधात ५० खटले दाखल केले आहेत, ही अन्यायाची परिसिमा आहे, असं अफझल यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com