esakal | मुस्लीम म्हणूनच अन्सारी टार्गेट; ओमप्रकाश राजभर
sakal

बोलून बातमी शोधा

Omprakash Rajbhar

मुस्लीम म्हणूनच अन्सारी टार्गेट; ओमप्रकाश राजभर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ - बहुजन समाज पक्षाचा (बसप) (BSP) तुरुंगातील आमदार मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याला पाठिंबा देताना सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासप) प्रमुख ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्यावरही टीका केली. मुख्तार मुस्लीम असल्यामुळेच त्याला टार्गेट करण्यात आल्याचा दावा राजभर यांनी केला.

इटावा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संसदेत तसेच उत्तर प्रदेश विधानसभेतही अर्ध्याहून जास्त गुन्हेगार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्धही अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. चौकशी झाल्यास ते सुद्धा तुरुंगात जातील. मुख्तार मात्र मुस्लिम असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्याकडे बोट करतो आहे. कुणालाही पूर्वांचलमध्ये निवडणूक जिंकायची असेल तर ते मुख्तार यांच्याकडे मदत मागतात.

हेही वाचा: एकात्मिक लढाऊ गट नेमण्याचा संरक्षण तज्ञांचा सल्ला

मुख्तारला बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी तिकीट नाकारले आहे. तो गुन्हेगार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. याविषयी राजभर म्हणाले की, मुख्तार हा गरिबांचा कैवारी असल्याचे याच मायावती म्हणत होत्या. आता मात्र त्यांनी भूमिका बदलली आहे.

आम्ही फक्त घोषणांसाठीच...

राजभर यांनी राम मंदिराचाही संदर्भ दिला. ते म्हणाले की, मंदिर बांधण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यासाठी ट्रस्ट स्थापण्यात आला तेव्हा त्यात अहीर, कुर्मी, बिंद, निषाद, कश्यप, राजभर, बंजारा, बहेरिया, कर्कवंशी अशा जातींच्या एकालाही स्थान देण्यात आले नाही. जेव्हा घोषणा दिल्या जातात तेव्हाच आमची गरज भासते.

लांबलचक नावाचे संमेलन

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष संमेलने घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजभर यांनी रविवारी वंचित शोषित अति-पिछडा अति-दलित वर्ग अधिकार संमेलन अशा लांबलचक नावाचे संमेलन आयोजित केले. ते म्हणाले की, प्रबुद्ध वर्ग संमेलन आयोजित करण्यात सर्वच पक्ष व्यग्र आहेत. अशावेळी मी सर्वाधिक मागास वर्गाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे.

loading image
go to top