मुलायमसिंहांकडे चार लाखांचे वीजबिल थकित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशमधील 'व्हीआयपी' संस्कृती संपविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून वीज विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याकडे चार लाख रुपयांचे वीजबिल थकित असल्याचे समोर आले आहे.

इतवाह (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील 'व्हीआयपी' संस्कृती संपविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून वीज विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याकडे चार लाख रुपयांचे वीजबिल थकित असल्याचे समोर आले आहे.

मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी असलेल्या वीजजोडणीला 5 किलोवॅटपर्यंत वीज वापरण्याची परवानगी आहे. मात्र तपास पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी तब्बल आठ वेळा मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरली असून त्याचे बिलही थकित असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी बिल भरण्यासाठी या महिनाअखेरपर्यंतची वेळ मागून घेतली. मुलायमसिंह यांच्या इतवाह मतदारसंघातील सिव्हीला लाईन्समध्ये त्यांचे भव्य निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी एक डझनहून अधिक खोल्या आहेत. तेथे त्यांचा स्वत:चा वातानुकूलित यंत्रणेचा प्लॅंट आहे. शिवाय स्विमिंग पूल आणि अनेक लिफ्टही आहेत. तेथे 40 किलोवॅटची वीज पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शुल्क आकारून बदल करून घेतले आहेत.

Web Title: Mulayam has electricity bill worth Rs. 4 lacs