लखनऊमध्ये बहुमजली इमारत कोसळली! तिघांचा मृत्यू; 30-40 लोक अडकल्याची भीती | Lucknow Building Collapsed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucknow Building Collapsed

Lucknow Building Collapsed : लखनऊमध्ये बहुमजली इमारत कोसळली! तिघांचा मृत्यू; 30-40 लोक अडकल्याची भीती

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील वजीर हसन परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर तिघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला आहे.

तसेच ढिगाऱ्याखाली 30 ते 40 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आली आहे. अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक घटनास्थळी पोहोचले.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी माहिती दिली की, या दुर्घटनेतील 7 जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इमारतीत 30-35 कुटुंबे राहत असल्याचे लोक सांगत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: CM Eknath Shinde Davos Visit : CM शिंदे चार्टर विमानाने जावूनही…; आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप

हेही वाचा: Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील लखनऊमधील वजीर हसनगंज रोडवर एक निवासी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे. तसेच त्यांनी सांगितले की, इमारत अचानक कोसळली. 3 मृतदेह सापडले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत आणि बचावकार्य सुरू आहे.

एका अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली असून घटनास्थळी SDRF आणि NDRF टीम पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh