
Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला
पुणे : धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी आज सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू राष्ट्र समितीचे धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली. (Ajit Pawar News)
धनंजय देसाई यांनी हिंदू जन आक्रोश आंदोलन हे पून्येश्र्वर मुक्त करण्यासाठी असल्याचे यावेळी सांगितले. पुण्यात आदिलशाहीचा उकिरड्यावरून आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचं नांगर फिरवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला.
धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत, त्यांना डायपर घातले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.
हेही वाचा: Pune News : पंतप्रधान मोदींनी याकडे...; आमदार राजा भैय्यांचं हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन
तसेच पुढे बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यवर देखील त्यांनी भाष्य केलं. देसाई म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते? कदाचित तुम्ही पवार नसू शकाल पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते.
ते म्हणाले की, हा लढा राजकीय नाही हे हिंदू हिताचे राजकारण आहे, दीड दमडीच्या राजकीय नेत्यांनी आम्हाला धर्माची व्याख्या सांगू नये असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कितीही मशागत केली तरी काँग्रेस उगवतच त्याला वारंवार खुरपावे लागते. तस अदीलशाईने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामती पर्यंत गेला आणि तिथे हर*** पिलावळ जन्माला आली. आम्हाला पक्षांची लंगोट नेसायची नाही आम्हाला जिहादी यांचा गर्भ मारायचा आहे.
हेही वाचा: बृजभूषण सिंहांच्या समर्थनार्थ ३ वेळचा महाराष्ट्र केसरी पैलवान आखाड्यात; म्हणाला, हे तर…
ते भाग्यनगर आहे..
महाराष्ट्राचा गाभारा विधानसभा आहे. या विधानसभेत जीहाद्यांचे राजकीय पोशिंदे, नवाब मलिक, अस्लम शेख, याकूब मेमन यांचे पोशिंदे जर विधान सभेत जाणार असतील तर आपल्या पितृदेवांचा तो अपमान आहे. हैदराबाद हे तेच लोक म्हणतात ज्यांच्या घरी हैदर आली गेला होता नाहीतर ते भाग्यनगर आहे, असेही देसाई म्हणाले .