
नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक तहव्वूर राणा याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान ‘एनआयए’ला असेही समजले, की या हल्ल्यामागे दुबईतील अन्य एका संशयित व्यक्तीचा हात होता. त्याला या कटाची माहिती होती.