दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
रविवार, 28 मे 2017

लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना राजधानी दिल्ली, मुंबईसह देशातील मेट्रो शहरांमध्ये किंवा पाकिस्तानच्या सीमेजवळील पंजाब आणि राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ला घडवू शकते, अशी शक्‍यता सुरक्षा संस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना राजधानी दिल्ली, मुंबईसह देशातील मेट्रो शहरांमध्ये किंवा पाकिस्तानच्या सीमेजवळील पंजाब आणि राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ला घडवू शकते, अशी शक्‍यता सुरक्षा संस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तैयबाचे 20-21 दहशतवादी पाकिस्तानमधून भारतामध्ये घुसल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हे दहशतवादी छोट्या-छोट्या समूह करून वेगळे झाले आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. मेट्रो आणि रेल्वे स्थानके, विमानतळे, हॉटेल्स आणि लोकप्रिय स्थळे, गर्दीचा बाजार, धार्मिक स्थळे आणि स्टेडिअम आदी ठिकाणी पोलिस विशेष लक्ष ठेवत आहेत. तसेच सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. भारतात घुसलेले दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्ब बनून घुसण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: mumbai breaking news mumbai news delhi news national news india news terrorist attack