विमान अपहरणाची भीती; चेन्नई, मुंबई, हैदराबादला अतिदक्षतेचा इशारा

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचे एकाच वेळी अपहरण होणार असल्याची माहिती मिळाल्याने या तिन्ही शहरातील विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांचे एकाच वेळी अपहरण होणार असल्याची माहिती मिळाल्याने या तिन्ही शहरातील विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद या तिन्ही विमानतळांवरून उड्डाण घेणाऱ्या विमानाचे 23 जणांचे पथक एकाच वेळी अपहरण करणार आहे. सहा तरुण या अपहरणाविषयी आपापसात चर्चा करत होते. ही चर्चा ऐकल्याचा दावा करणारे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना प्राप्त झाले आहे. दरम्यान गुप्तचर विभागालाही अशा अपहरणाविषयी सुगावा मिळाला आहे. त्यामुळे तिन्ही विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान विमानतळाच्या परिसरात गस्त घालत आहेत.

"एकूण 23 जण रविवारी एकाच वेळी मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून विमानांचे अपहरण करणार असल्याची चर्चा करत होते. ही चर्चा एका महिलेने ऐकली आणि तिने त्याबाबतचा ई मेल पाठवला', असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. विमान अपहरणाची धमकी मिळाल्याने चेन्नई विमानतळावरच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

Web Title: Mumbai, Chennai and Hyderabad airports put on hijack alert