esakal | Mumbai: आयएमपीएस द्वारे आता पाच लाख रुपये पाठवता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

आयएमपीएस
मुंबई : आयएमपीएस द्वारे आता पाच लाख रुपये पाठवता येणार

मुंबई : आयएमपीएस द्वारे आता पाच लाख रुपये पाठवता येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयएमपीएस द्वारे पैसे पाठविण्याच्या पद्धतीची वाढती लोकप्रियता पाहून यातील व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आज घेतला.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आयएमपीएस पद्धतीने चोवीस तास पैसे पाठविता येतात. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, एसएमएस, आयव्हीआरएस यापैकी कोणत्याही पद्धतीने हे पैसे पाठविता येतात. मात्र यातील व्यवहारांची मर्यादा फक्त दोन लाखांचीच असल्याने मोठी रक्कम पाठविणाऱ्यांना अडचणी येत होत्या. जानेवारी 2014 रोजी ही मर्यादा ठरविण्यात आली होती. एसएमएस व आयव्हीआरएस मार्फत फक्त पाच हजार रुपये पाठवता येतात.

हेही वाचा: मुंबई : कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, डोळ्यांच्या समस्या वाढल्या

आता आयएमपीएस ची ही मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश लौकरच जारी केले जातील, असेही आज स्पष्ट करण्यात आले आहे. हल्ली आयएमपीएस पद्धतीने काही तासांमध्येच पैसे संबंधिताला मिळतात. ही पद्धती चोवीस तास वापरता येते. काही बँका ही पद्धती वापरणाऱ्या ग्राहकांकडून जादा पैसे आकारतात, मात्र अन्य बँका असे शुल्क आकारीत नाहीत.

loading image
go to top