पत्नीचा मृतदेह घेऊन 'तो' फिरला 8 तास

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

सोकलराम पुरोहित असे या पतीचे नाव असून, पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पुरोहितची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मुंबई : पत्नीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील साकी नाका परिसरात घडली. जेव्हा त्या महिलेच्या पतीने हे पाहिले तेव्हा त्याने पत्नीचा मृतदेह तब्बल 8 तास कारमधून नेला. मात्र, सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित महिला मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली.

सोकलराम पुरोहित असे या पतीचे नाव असून, पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पुरोहितची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 6 जून रोजी रात्री दीडच्या सुमारास जेव्हा पुरोहित आपल्या घरी गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी मनीबेनने आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर त्याने मनीबेनचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि तिला साकी नाका येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  

दरम्यान, अपत्य नसल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये अनेकदा वादावादी होत असे. या वादातून मनीबेनने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. यापूर्वी पोलिसांनी मनीबेनचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र, तिचा मृत्यू अपघाती नसल्याचे समजल्यानंतर तिच्या पतीविरोधात भा. दं. वि. कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (झोन 10) एन. रेड्डी यांनी दिली. 

Web Title: Mumbai man drives around for 8 hours with wifes body in car