Mumbai Crime: क्रूरतेचा कळस ! आईनेच घेतला मुलीचा जीव..नंतर केला आत्महत्येचा बनाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime : A mother killed her daughter

क्रूरतेचा कळस ! आईनेच घेतला मुलीचा जीव..नंतर केला आत्महत्येचा बनाव

मुलीची हत्या करून तिला फासावर चढवल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या अंधेरीतील पारशीवाडा भागात घडली आहे. आईनेच मुलीचा गळा दाबत हत्या करून नंतर तिला फासावर चढवत आत्महत्येचा बनावा रचला. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी तिने सांगितलेल्या या खोट्या माहितीचा उलगडा मुलीच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून झाला. ( A mother killed her daughter and hang her body )

मानसिकरित्या आजारी असलेल्या मुलीची तिच्या आईने गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी या क्रूर महिलेने मुलीच्या मृतदेहाला फासावर लटकवले. ज्या प्रकारे मुलीला फासावर लटकवण्यात आले होते त्यावरून पोलीसांना हे आत्महत्येचे प्रकरण नसल्याचा संशय आला होता. शवविच्छेदनाची रिपोर्ट येताच पोलीसांचा संशय खरा ठरला.

शवविच्छेदनानंतर पुढे आलं सत्य

मृत मुलीला शवविच्छेदनासाठी कूपर रूग्णालयात हलवण्यात आले. शवविच्छेदन (Post Mortem) रिपोर्टमधून मुलीचा गळा दाबून हत्या झाली असल्याची माहिती पुढे आली. हत्येनंतर हे आत्महत्येचं प्रकरण दाखवण्यासाठी मृत मुलीला कापडाचा फास बनवून फासावर लटकवल्याची माहिती रिपोर्टमधून पुढे आली.

हेही वाचा: Pune Crime : पुण्यात स्कूलबसच्या ड्रायव्हरनेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार

रिपोर्टनुसार पोलिसांना पहिला संशय मृत मुलीच्या आईवर आला होता. तपासानंतर आणि विचारपूस केल्यानंतर अखेर मृत मुलीच्या आईने तिचा गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेविरूद्ध कलम ३०२ अंतर्गत मुंबई जोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Web Title: Mumbai News A Mother Killed Her Daughter And Hanged Her Body Post Mortem Report Revealed Her Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..