Union Minister Ashwini Vaishnaw gives brief comment on Mumbai local accident.Esakal
देश
Mumbai Local Accident : जास्त बोलण्याची गरज नाही; मुंबई दुर्घटनेवर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया, सोशल मीडियावरही पोस्ट नाही
Mumbai Local Accident : लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्यानं ते खाली कोसळले. ट्रॅकवर पडलेल्या १३ जणांपैकी चौघांचा मृत्यू झालाय.
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झाला. लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्यानं ते खाली कोसळले. ट्रॅकवर पडलेल्या १३ जणांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून इतर प्रवाशी जखमी आहेत. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये जीआरपी पोलिसाचाही समावेश आहे.