पार्सल मिळालं नाही म्हणून, थेट ऍमेझॉनच्या मालकाला केला मेल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जेफ बेझोस यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली.

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. कोरोना काळात तर अशाप्रकाच्या घरबसल्या शॉपिंगला उतच आलाय. या संधीचा फायदा घेत अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपली चांदी करुन घेत असतात. ऍमेझॉन ही एक अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी मानली जाते. तुम्ही देखील अशी ऑनलाईन खरेदी करत असालच. मात्र, एखादी डिलीव्हरी झाली नाही आणि तुमचे पैसेही परत मिळाले नाहीत, अशी एखादी घटना तुमच्यासोबत घडलीय का? अशीच एक घटना घडलीय मुंबईत. एका व्यक्तीला रिफंड न मिळाल्याने त्या व्यक्तीने थेट ऍमेझॉन कंपनीच्या सीईओलाच मेल केला आहे. आणि आश्चर्य म्हणजे कंपनीचे मालक जेफ बेझोस यांनी तात्काळ त्या व्यक्तीला मदतदेखील केली आहे. 

काय आहे घटना?
ओंकार हणमंते नावाच्या एका मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या आजीसाठी नोकिया कंपनीचा एक फोन ऍमेझॉनवरुन मागवला होता. कंपनीच्या वेबसाईटवर हा मोबाईल डिलीव्हर झाल्याचे दिसत होते मात्र, तो मोबाईल मात्र त्याला घरपोहोच मिळाला नव्हता. तो फोन डिलीव्हरी बॉयने त्यांना संपर्क न करताच परस्पर बिल्डींगच्या खाली ठेवून दिला होता, जिथून तो चोरी झाला. 

हेही वाचा - राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रप्रपंचावर अमित शहाचं भाष्य; म्हणाले...

त्याने चक्क जेफ बेझोस यांना केला मेल
या प्रकाराने हैराण झालेल्या ओकांरने थेट ऍमेझॉनच्या सीईओ जेफ बेझोस यांनाच मेला केला. आणि मेलवरुन त्यांना यासंबधी सविस्तर सांगून मदत मागितली. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे बेझोस यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली. कस्टमर केअर एक्झिक्युटीव्हकडे हा मेल पाठवून या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. कंपनीच्या कस्टमर केअर युनिटने तात्काळ ओंकार यांना संपर्क साधून त्यांची तक्रार जाणून घेतली. तसेच त्यांचे पैसेही त्यांना परत करण्यात आले. 

मोबाईल झाला होता चोरी
ओंकारला हा फोन डिलीव्हर झाला नव्हता तरी ऍमेझॉन वेबसाईटवर डिलीव्हरी झाल्याचे दाखवत होते. खरं तर हा फोन त्याच्या बिल्डींगच्या खाली आला होता. मात्र त्या डिलीव्हीर बॉयने ते पार्सल खालीच सोडलं होत. हे पार्सल चोरी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे समजलं. ही खरं तर कंपनीच्या डिलीव्हरी बॉयचीच चूक होती. या प्रकरणात आपले पैसे मिळवण्यासाठी ओंकारने थेट जेफ यांनाच संपर्क साधला. 

हेही वाचा - चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

असा केला मेल
हाय जेफ, तुम्ही ठीक असाल अशी आशा करतो. मी तुमच्या कंपनीच्या सर्व्हीसवर निराश झालो आहे. मी ऍमेझॉनवरुन मागवलेला फोन मला न मिळताच सोसायटीच्या गेटवर परस्पर ठेवण्यात आला होता जिथून तो चोरी झाला. मला डिलीव्हरीसंदर्भात कसलाही कॉल आला नाही. याप्रकरणी मी कस्टमर सर्व्हीसला विचारणे केले असता त्यांनी मला नीटशी मदत केली नाहीये. हे सगळं माझ्यासाठी निराशाजनक आहे. आता मी इथून पुढे काहीही मागवताना विचार करेन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbaikar omkar hanmante mailed amazon ceo jeff bezos about poor costumer service get refunded