
Delhi fire: PM मोदींपाठोपाठ अरविंद केजरीवालांची मदतीची मोठी घोषणा
पश्चिम दिल्लीतील (Delhi) ग्रीन लाईनवरील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील (Mundka metro station) एका व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याने 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी मुंडका येथील इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच दिल्ली सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
मृतांप्रती शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करून घेण्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेमागे जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे केजरीवाल यांनी वक्तव्य केले आहे. बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
दिल्लीतील मुंडका परिसरातील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग (Delhi Mundka Fire) लागली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. 50 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अजूनही अनेक लोक इमारतीत अडकले आहेत. अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा शोध सुरूच आहे. ग्रीन कॉरिडॉर करून जखमींना संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यात गुंतल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांनी अटक करण्यात आली आहे. इमारतीच्या मालकाची ओळक मनीष लाकारा यांच्याद्वारे झाली आहे. जो इमारतीच्या सर्वात वरच्या फ्लोर वर राहत होता.
Web Title: Mundka Fire Tragedy Delhi Cm Arvind Kejriwal Announced Compensation Of Rs 10 Lakh For The Dead
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..