बेळगावात एकाचा निर्घृण खून

अमृत वेताळ 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे.

बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे.

थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण, घटनास्थळी मद्याच्या बाटल्या आणि ग्लास पडल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त महानिग नंदगावी, माळमारुती पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस उपनिरीक्षक सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Murder in belgum