गर्लफ्रेंडसाठी केला सख्या भावाचा खून!

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालविण्यासाठी खोलीबाहेर न जाणाऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालविण्यासाठी खोलीबाहेर न जाणाऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हितेश वर्मा (वय 28) हा दिल्ली विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. तर त्याचा भाऊ हिमांशू वर्मा (वय 23) हा संस्कृतचा अध्यापक होता. हे दोघे उत्तर दिल्लीतील बुरारी परिसरात राहत होते. त्यांचे पालक झांशीमध्ये आहेत. रविवारी रात्री उशिरा हितेशने त्याच्या मैत्रिणीला फ्लॅटवर आणले आणि हिमांशूला खोलीबाहेर जाण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा थंडी असल्याने हिमांशूने बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे हितेश संतप्त झाला. त्याने फ्लॅटमध्ये असलेले डंबेल्स (व्यायामाचे साहित्य) हिमांशूच्या दिशेने फेकले. हिमांशू गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यु झाला. हिमांशूची हत्या झाल्यानंतर तीन तासांनी सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना याबाबत फोनद्वारे माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर हितेशने दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी हिमांशूची हत्या केल्याचे खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर पोलिसांना गादीखाली लपवलेले डंबेल्स मिळाले. तसेच घरमालकानेही घरातून आत कोणीही आले नसल्याचे सांगितले. सविस्तर तपासानंतर हिमांशूने गुन्हा कबूल केल्याची माहिती, पोलिस उपायुक्त मधूर वर्मा यांनी दिली.

हितेश आणि हिमांशू गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीमध्ये राहात होते. हितेशचे गेल्या काही दिवसांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच याबाबत हिमांशू पालकांना कळवेल याची त्याला भीती होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Murder of brother for girl friend