तिहेरी हत्याकांडप्रकरणी एका संशयिताला अटक

पीटीआय
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी आज केला. हत्या झालेल्या कुटुंबीयाच्या परिचयातील एका गवंड्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उत्पल बेहरा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी आज केला. हत्या झालेल्या कुटुंबीयाच्या परिचयातील एका गवंड्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उत्पल बेहरा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

गवंडी असलेला उत्पलचा हत्या झालेल्या कुटुंबाशी परिचय होता. उत्पलला मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरदिघी येथून सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

जियागंज भागातील घरामध्ये शिक्षक असलेल्या बंधूप्रकाश पाल (वय ३५), त्यांची गर्भवती असलेली पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलगा यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले होते. 

आर्थिक कारणांमुळे पाल आणि उत्पल यांच्यात वाद झाला होता, त्यातूनच हे हत्याकांड झाल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder crime suspected arrested