अपमानाचा बदला घेण्यासाठी देवचा खून

पीटीआय
सोमवार, 25 जून 2018

बडोद्यातील देव तडवी या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी दहावीतील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून, संबंधित आरोपी विद्यार्थ्याने शिक्षकाकडून झालेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी देवचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद : बडोद्यातील देव तडवी या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी दहावीतील विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून, संबंधित आरोपी विद्यार्थ्याने शिक्षकाकडून झालेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी देवचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिक्षकांनी केलेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी आपण देवचा खून केला, भारती विद्यालयाची प्रतिष्ठा आपल्याला धुळीस मिळवायची होती, देवचा खून केल्याने शाळेला सुटी मिळेल, हे मला माहीत होते. त्यामुळेच मी त्याला मारल्याची कबुलीही आरोपी विद्यार्थ्याने दिली आहे. या प्रकरणातील आरोपी बालगुन्हेगार असल्याने त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही, आज त्याला बडोद्यातील पोलिस ठाण्यात सादर करण्यात आले. बालगुन्हेगार कायद्यान्वये आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून, संबंधित आरोपीला बालसुधारगृहामध्ये पाठविण्यात येईल. या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस आयुक्त एस. जी. पाटील यांनी सांगितले की, ""आरोपी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते, तो निर्विकार चेहऱ्याने चौकशीला सामोरे गेला. तब्बल दोन तास तो एक शब्दही बोलला नाही.'' 
 

Web Title: murder due to insulting