मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा सुपारी देऊन खून; लोकसभा निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

श्रीनिवासपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Congress leader Srinivas
Congress leader Srinivasesakal
Summary

माजी सभापती रमेश कुमार आणि गृहमंत्री परमेश्वर यांच्याही ते जवळचे होते.

बंगळूर : राज्यात काँग्रेसच्या एका नेत्याचे (Congress leader) हत्याकांड उघडकीस आले असून, कोलारमध्ये सुपारी देऊन त्यांचा खून केल्याचा संशय आहे. ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर तालुक्यातील काँग्रेस नेते नगरसेवक सेनाप्पा ऊर्फ ​​श्रीनिवास असे त्यांचे नाव आहे.

माजी विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांचे ते समर्थक होते. मुळबागीलू रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या रेस्टॉरंटजवळ सहा अज्ञातांनी हा हल्ला करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीनिवास यांना स्थानिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

Congress leader Srinivas
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

श्रीनिवासपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. सुपारी देऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. श्रीनिवास हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते.

Congress leader Srinivas
Navratri Festival : बदामीनंतरचे मूळ देवीपीठ 'बनशंकरी'; मंदिराला तब्बल 200 वर्षांपूर्वीचा इतिहास, जंगलात सापडली देवीची मूर्ती!

माजी सभापती रमेश कुमार आणि गृहमंत्री परमेश्वर यांच्याही ते जवळचे होते. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com