Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवावी, अशी लोकांची मागणी आहे.
Double Maharashtra Kesari Chandrahar Patil
Double Maharashtra Kesari Chandrahar Patilesakal
Summary

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांनी आगामी लोकसभेच्या आखाड्यासाठी शड्डू ठोकला.

सांगली : उमेदवारीसाठी सर्व पक्षांचा आग्रह आहे. लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवावी, अशी लोकांचीही मागणी आहे. तेव्हा ‘लोकसभा’ शंभर टक्के लढवणार असल्याचे सांगत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांनी आगामी लोकसभेच्या आखाड्यासाठी शड्डू ठोकला.

जिल्ह्यातील हजार युवकांसह दिल्लीत जाऊन सैनिकांसाठी रक्तदानाच्या संकल्पाची घोषणा करण्यासाठी ते काल (शनिवार) सांगलीत आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना गेली काही दिवस त्यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर स्पष्ट भाष्य केले.

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड, टोकाचे विरोधक आले एकत्र; तब्बल 9 वर्षांनी 'त्या' Photo ची झाली आठवण

गेल्या काही महिन्यांत बैलगाडी स्पर्धा, गोवंश संवर्धन, देशातील सर्वांत मोठा तालीम आखाडा, एक लाख बाटल्या रक्तसंकलन अशा उपक्रमांतून चंद्रहार चर्चेत आहेत.

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil
Shashikant Shinde : तुमचं पाप दुसऱ्याच्या माथी फोडू नका, आता तुमच्या पापाचा घडा भरलाय; आमदार शिंदेंचा भाजपला इशारा

‘सर्वपक्षीय ऑफर’

कोणत्या पक्षातून लढणार या प्रश्‍नावर चंद्रहार यांनी देशात जेवढे पक्ष आहेत, त्या सर्वांची मला ऑफर आहे. जिल्ह्यात फिरताना लोकही माझ्याकडे लढण्याचा आग्रह करतात. वेळ आली की शंभर टक्के निर्णय घेऊ, असे उत्तर दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com