Murder : गोहत्येच्या संशयातून दोन तरुणांची हत्या; लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of two youths on suspicion of cow slaughter

गोहत्येच्या संशयातून दोन तरुणांची हत्या; लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बरघाट विधानसभेतील सिमरिया गावात दोन आदिवासी तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. गोहत्येच्या संशयावरून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू (Murder) झाला. संपत बत्ती (रा. सागर) व धनसा (रा. सिमरिया) अशी मृतांची नावे आहेत. युवकांच्या हत्येने आदिवासी समाज संतप्त झाला आहे. याचा निषेध नोंदवत आदिवासींनी कुरईचा राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. (Murder of two youths on suspicion of cow slaughter)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० लोकांच्या टोळीने या तरुणांना सोमवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास बेदम मारहाण केली. कुरई पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपत व धनसा या युवकांच्या घरातून काही मांस जप्त करण्यात आले आहे. त्याचा तपास सुरू आहे. या हल्ल्यात तक्रारदार ब्रजेश बत्ती हेही जखमी झाले.

हेही वाचा: दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् आजोबा, नातवाला चिरडले; सून गंभीर जखमी

जमावाने दिलेल्या माहितीनुसार, संपत व धनसा यांच्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्याने (Beating) हल्ला केला. तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस आमदार काकोडिया यांनी केला आहे. मृतांच्या (Murder) कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची नुकसान भरपाई आणि नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आरोपी तरुण फरार

प्रकरणाचे गांभीर्य पाहता सिवनी एसपी आणि जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आमदारांना समजावले. आरोपी तरुण अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Murder Of Two Youths On Suspicion Of Cow Slaughter Madhya Pradesh Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top