भांडण झाले तर खून करुन या; कुलगुरुंचा अजब सल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

''जर आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्याने कधी कोणासोबत भांडण केले. तर त्याने मार न खाता मारून आले पाहिजे. इतकेच नाहीतर शक्य असल्यास संबंधित व्यक्तीचा खून करा. त्यानंतर काय होतं ते आम्ही पाहू''.

- राजाराम यादव,  कुलगुरू, पूर्वांचल विद्यापीठ

नवी दिल्ली : ''जर आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्याने कधी कोणासोबत भांडण केले. तर त्याने मार न खाता मारून आले पाहिजे. इतकेच नाहीतर शक्य असल्यास संबंधित व्यक्तीचा खून करा. त्यानंतर काय होतं ते आम्ही पाहू'', असा अजब सल्ला उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादव यांनी दिला. 

गाजीपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात कुलगुरु यादव यांनी हा सल्ला दिला. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 'उच्च शिक्षणासमोरील आव्हाने' या विषयावर यादव बोलत होते. ते म्हणाले, ''दगडावर पाय मारून पाण्याची धार त्यामधून काढू शकतो, तोच तरुण विद्यार्थी असतो. प्रत्येकजण जीवनात संकल्प निश्चित करत असतो. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशाप्रकारे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यालाच पूर्वांचल विद्यार्थी म्हणतात''. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''जर तुम्ही पूर्वांचल विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर माझ्याकडे कधीही रडत येऊ नका. जर एखाद्या व्यक्तीशी भांडण झाले तर त्याला मारहाण करून यायची. तुमची इच्छा झालीच तर त्याचा खूनही करा. त्यानंतरचे मी पाहतो".

Web Title: Murder them beat them we will take care says Purvanchal University VC Raja Ram Yadav