Murder For Insurance Claim : कर्ज फेडण्यासाठी पत्नीवर झाडल्या गोळ्या; अगोदर काढला ३५ लाखांचा विमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder Latest news

Murder : कर्ज फेडण्यासाठी पत्नीवर झाडल्या गोळ्या; अगोदर काढला ३५ लाखांचा विमा

Murder For Insurance Claim राजगड : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीच्या ३५ लाखांच्या विम्याच्या दाव्याचे पैसे मिळवण्यासाठी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. कर्जाखाली दबलेल्या बदरीप्रसाद मिना नावाच्या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपीने इंटरनेटची मदत घेतली होती. पूजा असे मृत महिलेचे नाव आहे.

कर्ज फेडण्याचे मार्ग शोधण्यासाठी त्याने इंटरनेटवर (Internet) अनेक व्हिडिओ पाहिले. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने आधी पत्नीचा विमा काढला आणि नंतर ते पैसे मिळवण्यासाठी तिची हत्या केली. पूजाच्या पतीने २६ जुलैच्या रात्री ९ वाजता भोपाळ रोडवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख

आरोपी पतीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता पतीवर संशय त्याला ताब्यात घेतले. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने चार जणांविरुद्ध पत्नीच्या हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला. मात्र, घटनेच्या वेळी चारही आरोपी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी बद्रीप्रसाद मिनासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Murder Wife Insurance Claim Crime News Madhya Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..