2 अल्पवयीन मुलींच्या हत्येचा छडा; मृतदेह लटकवले होते झाडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

2 अल्पवयीन मुलींच्या हत्येचा छडा; मृतदेह लटकवले होते झाडाला

गुवाहाटी- दोन अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणाचे गुढ उकलले आहे. आसाम पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावल्याचा दावा केला आहे. मागील शनिवारी कोक्राजार जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह झाडाला लटकत असल्याचं आढळलं होतं. मुलींनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी वाटत होतं. पण, दोन्ही मुलींच्या एकत्र मृत्यूने त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय घेण्यात येत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. (Murdered Hanged From A Tree Assam Cops Crack Minors Death Case)

पोलिसांनी सांगितलं की, ''अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. आत्महत्या वाटावी यासाठी मुलींचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यातीत तिघांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.''आरोपींनी गुन्हाची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. पथकाने 72 तासांच्या आत आरोपींना पकडले आहे, असं एसपी प्रतिक विजय कुमार तुंबे म्हणाले.

हेही वाचा: केंद्राचा ट्विटरला दणका! कंपनीने कायदेशीर संरक्षण गमावले

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मांनी ट्विट करुन आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली आहे. दोन अल्पवयीन मुलींचा बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती मला दिली आहे. मी रविवारी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात आल्याचा मला आनंद आहे, असं हेमंता बिस्व शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा: कोरोना लस घ्यायची आहे? ;CoWin रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली सोपी

दरम्यान, आसामच्या कोक्राजार जिल्ह्यातील एका गावात 14 आणि 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला होता. दोन्ही मुली एकाच कुटुंबातील होत्या. मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पोलिस प्रशासन सक्रीय झाले होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crime
loading image
go to top