कोरोना लस घ्यायची आहे? ;CoWin रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली सोपी

१८ ते ४४ वयोगटातील असंख्य जणांनी अजूनही लस घेतली नाही
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

गेल्या सव्वा वर्षांपासून संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूची (coronavirus) दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. त्याचबरोबर प्रशासानाने लसीकरणाचा (vaccination) वेगही वाढवला आहे. परंतु, लस घेण्यापूर्वी नागरिकांना कोविन अ‍ॅपवर (Cowin) रजिस्ट्रेशन करावं लागत आहे. मात्र, गावखेड्यातील अनेक जणांना या अ‍ॅपचा वापर करता येत नसल्यामुळे त्यांना लस घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणूनच, अद्यापही १८ ते ४४ वयोगटातील असंख्य जणांनी लस न घेतल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नागरिकांची ही अडचण लक्षात घेता केंद्र सरकाराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता गावातील नागरिकांना थेट कोविड सेंटरवर जाऊन लस घेता येणार आहे. (cowin-registration-for-covid-vaccine-not-mandatory-clarifies-central-govt)

कोरोनावर लस घेण्यापूर्वी नागरिकांना कोविन अ‍ॅपवर (Cowin) रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. या अॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर अपॉईमेंट घ्यावी लागत असून त्यानंतर नागरिकांना लसीकरणासाठी बोलावलं जातं. मात्र, गावखेड्यातील असंख्य नागरिकांना हे अ‍ॅप वापरता येत नसल्यामुळे लस घेता येत नव्हती. परंतु, आता केंद्र सरकाराने यावर तोडगा काढला आहे. ज्या नागरिकांना कोविन अ‍ॅपवर (Cowin) रजिस्ट्रेशन करता येत नाही. ते आता थेट कोविड सेंटरवर जाऊन लस घेऊ शकतात. कोविड सेंटरवर गेल्यानंतर या नागरिकांचं रजिस्ट्रेशन होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Mohf) दिली आहे.

Corona Vaccination
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'
Corona Vaccination
Fact Check: घरगुती उपचारांमुळे कोरोना बरा होतो? सत्य आलं समोर

कोविड सेंटरवरच होणार रजिस्ट्रेशन

देशातील अनेकांकडे आजही स्मार्टफोन नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे स्मार्टफोन नसलेले नागरिक कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकत नाही. त्यामुळेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर तोडगा काढला आहे. त्यानुसार, १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती कोविड सेंटरवर जाऊन लस घेऊ शकते. या सेंटरवर ऑनसाईट रजिस्ट्रेशनची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

1075 वर करा फोन

जर कोणत्याही व्यक्तीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत हवी असेल तर 1075 या कोरोना व्हॅक्सीन हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com