काळ्याफिती बांधून रायबागात रमजान ईद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

रायबाग (बोळगाव) : नंदीकुरळी येथील घटनेनंतर रायबागात झालेल्या तोडफोडीप्रकरणी निरपराध्यांना ताब्यात घेण्यात येऊन कारवाई झाली आहे. त्यामुळे संबंध नसलेल्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांसह पोलिस खात्याला निवेदने देऊन रमजान ईद काळादिन म्हणून पाळण्याचा इशारा दिला होता. पण त्याचा उपयोग न झाल्याने शुक्रवारी (ता. 16) मुस्लीम बांधवांनी दंडाला काळ्या फिती बांधून व काळे निशाण दाखवून नमाजपठण करत ईद साजरी केली.

नंदीकुरळी येथील खडीमशीन बंद करण्याप्रकरणी 29 मे रोजी रात्री झालेल्या दगडफेकीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर 30 मे रोजी रायबागात बससह आगाराच्या नियंत्रण कक्षाची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी लाठीहल्लाही केला. या प्रकरणी संबंध नसलेल्या निरपराध्यांना अटक केली असून जामीन न मिळण्यासाठी वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील निरपराध्यांना सोडून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांसह पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.

तसेच मागणीची दखल न घेतल्यास रमजान ईद सण काळादिन म्हणून पाळण्याचा कडक इशाराही दिला होता. त्यानुसार आज शनिवारी (ता. 16) मुस्लीम बांधवांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला. मुस्लीम बांधवांनी दंडाला काळ्याफिती बांधून काळे निशाण दाखवत रायबाग-जलालपूर रस्तावरील ईदगाह मैदानापर्यंत जावून सामूहिक नमाज पठण केले. त्यात शहरासह ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरासह ईदगाह मैदानावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
रायबाग तालुक्‍यातील कुडची, चिंचली, नसलापूर, दिग्गेवाडी, बुवाची सौंदत्ती, हारूगेरी येथील मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकमेकांना भेटून व दिवसभर सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.

Web Title: muslim community celebrated ramjan with black strips