Mohan Bhagwat
Mohan Bhagwatesakal

RSS च्या मोहन भागवतांचं मुस्लिमांबाबत मोठं विधान; म्हणाले, 'मुस्लिमांना घाबरण्याची काहीच..'

'भारतात मुस्लिमांना (Muslim) घाबरण्यासारखं काहीच नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे.'
Published on
Summary

हिंदू (Hindu) ही आपली ओळख, आपली सभ्यता, आपलं राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येकाला आपलं मानणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा गुण आहे.

एकीकडं संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एलजीबीटी (LGBT) समुदायाचं समर्थन केलं आणि दुसरीकडं त्यांनी मुस्लिमांना सल्ला दिला.

माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले, 'भारतात मुस्लिमांना (Muslim) घाबरण्यासारखं काहीच नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे. आपण देशावर एकदा राज्य केलं आणि पुन्हा राज्य करू या विचारसरणीतून बाहेर यायला हवं. आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणतीही अडचण नाही. भारत हा भारतच राहिला पाहिजे हे साधं सत्य आहे.'

Mohan Bhagwat
Imran Khan यांच्या अडचणीत वाढ; माजी पंतप्रधानांना होणार अटक? वॉरंट जारी

आपणच श्रेष्ठ आहोत या विचारातून मुस्लिमांनी बाहेर पडावं. सत्य हे आहे की इथं जो कोणी राहतो. मग, तो हिंदू असो वा कम्युनिस्ट, त्यानं या तर्कातून बाहेर आलं पाहिजे. संघानं नेहमीच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवलंय, पण जे राजकारण आपल्या देशाचं धोरण ठरवतं ते राष्ट्रहिताशी निगडीत आहे. ते हिंदूंच्या हिताचं आहे. आम्ही त्याच्याशी सदैव संलग्न आहोत. फरक एवढाच की, पूर्वीचे स्वयंसेवक सत्तेत नव्हते. आजच्या परिस्थितीत हा एकमेव बदल आहे. संघ समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतो, असंही भागवत यांनी सांगितलं.

Mohan Bhagwat
Indian Army : कुपवाडात मोठी दुर्घटना; भूस्खलनामुळं JCO अधिकाऱ्यासह 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू

हिंदू (Hindu) ही आपली ओळख, आपली सभ्यता, आपलं राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येकाला आपलं मानणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा गुण आहे. फक्त आमचं बरोबर, तुमचं चूक असं आम्ही कधीच म्हणत नाही. तू तुझ्या जागी बरोबर आहेस, मी माझ्या जागी बरोबर आहे. शेवटी संघर्ष करण्याची काय गरज आहे, चला एकत्र पुढं जाऊया. हे हिंदुत्व आहे, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com