भजन गाणाऱया मुस्लिम युवतीला धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

नवी दिल्ली- कन्नड रियालिटी शो दरम्यान भजन गाणाऱया सुहाना सईद या मुस्लिम युवतीला सोशल नेटवर्किंगवरून धमक्या सुरू झाल्या आहेत. तू भजन गायल्यामुळे तुझ्या आई-वडिल जन्नतमध्ये जाणार नाहीत, असे कट्टर पंथियांनी म्हटले आहे.

कन्नड रियालिटी शोमध्ये बावीस वर्षीय सुहाना हिने भजन गायले होते. यावेळी प्रेक्षक व परिक्षकांनी तिचे कौतुक केले होते. मात्र, कट्टरपंथियांना तिने भजन गायलेले आवडले नाही. सुहाना ही मुस्लिम असूनही तिने हिंदू देवतांचे भजन का गायले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मंगळूर मुस्लिम फेसबुक पेजवरून सुनाहानावर टीका करण्यात आली आहे. पेजवर म्हटले आहे की, 'सुहाना हिने नागरिकांसमोर येऊन गाणे म्हटल्यामुळे मुस्लिम समुदायाला अपमानित केले आहे. तिने कोणतेही मोठे काम केलेले नाही.' सुहानाबरोबरच तिच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे. सुहाना हिच्या आई-वडिलांनी तिचे सौंदर्य दाखविण्यासाठी नागरिकांसमोर गाणे गायला लावले, यामुळे त्यांना जन्नत मिळणार नाही.

कन्नड संगितकार अर्जुन जनाया यांनी सुहानाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'सुहानाचा आवाज खूपच छान आहे. हिंदू भजन गाऊन तिने दोन्ही धर्मांमध्ये एकता निर्माण केली आहे. संगीत हे नागरिकांना एकत्र जोडते.'

Web Title: Muslim girl sings bhajan in show, trolled